परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील घटना
रूग्णवाहिका चालकावर गुन्हा
परभणी/सोनपेठ (Sonpeth Accident) : मध्यपी अवस्थेत भरधाव वेगात रूग्णवाहिका चालवून दुचाकी-स्वाराला धडक दिली. यात गंभीर जखमी दुचाका-rस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे घडली. सदर प्रकरणी ११ जानेवारीला सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिमराव गोविंदराव चांदवडे वय – ६० वर्ष, असे मयताचे नाव आहे. याबाबत रविवाज चांदवडे यांनी खबर दिली आहे. भिमराव चांदवडे हे ५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता एम.एच.२२ ए.बी.९२२७ या (Sonpeth Accident) दुचाकीने सोनपेठकडून थडी उक्कडगावकडे जात असतांना शेळगाव येथे एम.एच.१४ सी.एल.०९६२ या क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने धडक दिली. यात भीमराव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Sonpeth Accident) अपघाती मृत्यूस कारणीभूम ठरल्याबाबत रूग्णवाहिका चालक मुंजा कारभारी आळसे याच्यावर सोनपेठ पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोउपनि.किरकण हे करत आहेत.