दैनिक देशोन्नती वृत्ताची दखल
परभणी/सोनपेठ (Sonpeth Bus Stand) : बसस्थानकात पथदिवे, पंखे, पाण्याची सुविधा यांसह धुळीचे साम्राज्य या सदरला खाली दै. देशोन्नतीने वृत्त प्रसिद्ध होताच तात्काळ विभागीय नियंत्रक सचिन डफले यांनी दखल घेत आज दि १० मार्च सोमवार रोजी (Sonpeth Bus Stand) सोनपेठ बसस्थानकाला भेट दिली आहे.
सोनपेठ हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी प्रवाशांची सारखी वर्दळ असते.त्या मानाने सोनपेठ बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीत.त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Sonpeth Bus Stand) सोनपेठ बसस्थानकात धुळीचे साम्राज्य या सदरला दैनिक देशोन्नती अंकात दि १० मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध होताच परभणी विभागीय नियंत्रक सचिन डफले यांनी सोमवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान बसस्थानकाला भेट दिली आहे.
या भेटी दरम्यान संपूर्ण बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. दरम्यान (Sonpeth Bus Stand) बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी पाण्याची सोय करणे, पथदिवे चालू करणे, पंखे बसविणे, यांसह अन्य मुलभूत सुविधा देण्यासाठी तात्काळ विभागीय नियंत्रक कार्यालयाकडे माहिती सादर करावी आशा सुचना सोनपेठ येथील वाहतूक नियंत्रक बापु शिंदे यांना देण्यात आले आहे.
तसेच बसस्थानक परिसरात असलेल्या स्वच्छता संदर्भात अवश्यक सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बस स्थानकात असलेल्या वेगवेगळ्या वृक्ष लागवड केली आहे. त्या वृक्षांची पाहाणी केली आहे.दै.देशोन्नतीने वृत्त प्रकाशित केल्यामुळे यांची (Sonpeth Bus Stand) विभागीय नियंत्रक सचिन डफले यांनी घेतली असल्यामुळे दै देशोन्नतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.