परभणी/सोनपेठ (Sonpeth SBI Bank) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या भारतीय स्टेट बँकेत (SBI Bank) अपुरे अधिकारी व कर्मचारी असल्यामुळे आर्थिक व्यवहार करताना मोठी गैरसोय होत आहे. त्यात बँकेची इंटरनेट सेवा विस्कळित होऊन संपूर्ण पणे कारभार ठप्प होत असल्याने खातेदारांना तासन् तास ताटकळत बसावे लागत आहे. याकडे बँक प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सोनपेठ शहरातील एकमेव असलेल्या भारतीय स्टेट बँकेत (SBI Bank) खातेदार संख्या अंदाजे १० ते १५ हजार आहे. शेतकरी, व्यापारी , नागरीक, महिला, नोकररदार, शालेय विद्यार्थी, पिक कर्ज खातेदार, महिला बचत गट, अन्य खातेदारांचे आर्थिक व्यवहार बँकेतुन होत आहे. मात्र बँकेचा दैनंदिन कारभार सुरळीत होत नाही.भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक यांची बदली दोन महिन्यांपूर्वी झाली आहे. याठिकाणी अद्याप शाखाधिकारी नियुक्त केले नसल्यामुळे बँकेच्या कारभार अडथळे निर्माण होत आहे. त्यातच अपुरे कर्मचारी असल्यामुळे खातेदारांना चलन कोणत्या टेबलवर देयचे ते समजत नसल्याने (SBI Bank) बँकेत चकरा माराव्या लागत आहे. बँक शाखाधिकारी नसल्याने कर्मचार्यांवर अंकुश नसल्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे.
लाडक्या बहिणींचे पैसे मिळवण्यासाठी व केवायसी करण्यासाठी बँकेच्या (SBI Bank) बाहेर दिवसभर ताटकळत उभे राहावे लागतं आहे. त्या लाडकी बहिण उपासी पोटी उभा राहुन महिलांना चकरा येऊन पडल्या असल्याची घटना घडली आहे.मात्र याकडे बँक प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. लाडकी बहिण योजनेचे पहिला व दुसरा हप्ता खात्यावर जमा झाला असल्याने बँकेत महिलांच्या रांगा लागल्या जात आहेत. बँकेच्या दारात महिला पहाटे पासून पैसे काढण्यासाठी व केवायसी करण्यासाठी रांगांच्या रांग लागल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचारी, व्यापारी,महिला, सेवानिवृत्त शिक्षक, शेतकरी अन्य नागरीक दररोज बँकेत (SBI Bank) गर्दी दिसत आहे. मात्र अपुरे कर्मचारी व कनेक्टिव्हिटी बंद पडत असल्याने ग्राहकांना व खातेदार नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याकडे बँक प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भारतीय स्टेट बँकेला (SBI Bank) दुसरा शनिवार, रविवार, सोमवारी ईद ए मिलाद, सलग सुट्टी असल्याने आज शुक्रवार खातेदार व शेतकर्यांची ई-केवायसी व पैसे काढण्यासाठी गर्दी असल्याची पहावयास मिळत आहे.