येलो मोझॅक, चारकोल रॉटच्या प्रादुभार्वाने सोयाबीनला फटका
सेलू (Soybeans Farmers) : सध्या सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिवळे होत सुकू करपत आहे. ऐन शेंगा लागलेल्या अवस्थेत सोयाबीनचे नुकसान होत आहे. उत्पन्नाची आशा मावळल्याने शेतकर्यांनी थेट जनावरे चराईसाठी सोडण्यास सुरूवात केलेली आहे. कपाशीपाठोपाठ अनेक शेतकरी सोयाबनीची लागवड करतात. अनेक जण मुख्य पीक म्हणून (Soybeans Farmers) सोयाबीनचे उत्पादन घेतात.
यावर्षी देखील मोठ्या संख्येने शेतकर्यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे. सध्याच्या स्थितीत सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत. काही दिवसांनी सोयाबीन काढणीला येणार आहे. पण, हातातोंडाशी येऊ लागलेला घास हिरावण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनवर येलो मोझॅक, चारकोल रॉट आदी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन धोक्यात आले आहे. (Soybeans Farmers) सोयाबीन पिवळे होऊन कपरत आहे. त्यामुळे शेंगा भरण्याची आणि उत्पन्न होण्याची आशा मावळू लागली आहे. शेतकर्यांनी केलेला खर्चही भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडलेली आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
केळझर येथील शेतकरी संदीप रमेशराव तेलरांधे व विठ्ठल रमेशराव तेलरांधे दोघा भावांनी १२ एकर शेती १ लाख ७० हजार रुपयांनी मक्त्याने केली. त्यातील सहा एकरात कपाशीची तर सहा एकरात सोयाबिनची लागवड केली. सहा एकरातील सोयाबीनवर मोठा खर्च केला. मात्र आता सोयाबीन पिवळे पडून कपरले आहे. उत्पन्नाची आशा मावळल्याने त्यांनी सहा एकरातील (Soybeans Farmers) सोयाबीनमध्ये जनावरे चराईसाठी सोडलेली आहेत. नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अशीच परिस्थिती संदीप रमेशराव तेलरांधे, विठ्ठल रमेशराव तेलरांधे, निलेश अशोक लोणकर, समीर चंद्रकांत पेटले यांचीही आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन पिवळे होऊन करपले आहे. यामुळे शेतकर्यांचा खर्च व्यर्थ जावून एक रुपयाही उत्पन्न मिळण्याची शक्यता राहिलेली नाही. याकडे शासनाने लक्ष देत सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.