स्मृती मंधाना विश्वविक्रम

स्मृती मंधानाने सुवर्णपदकाच्या सामन्यात रचला विश्वविक्रम!

Smriti Mandhana Record: आशियाई क्रीडा स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळताना मंधानाने 11 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. हा पराक्रम करणारी ती महिला क्रिकेटर..

स्मृती मंधानाने सुवर्णपदकाच्या सामन्यात रचला विश्वविक्रम!

Smriti Mandhana Record

 

11 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू

नवी दिल्ली/ जपान (Smriti Mandhana Record) : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाने 22 सप्टेंबर 2026 हा दिवस महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळताना (Smriti Mandhana) मंधानाने 11 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. हा पराक्रम करणारी ती महिला क्रिकेटमधील पहिली फलंदाज ठरली आहे. 11 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी मंधानाला केवळ 13 धावांची गरज होती. तिने श्रीलंकेविरुद्धच्या डावात सुरुवातीच्या 10 चेंडूंतच ही आवश्यक धावसंख्या पूर्ण करत इतिहास रचला.

मंधानाची फटकेबाजी; 79 धावांची खेळी

ऐतिहासिक विक्रम केल्यानंतरही मंधानाची (Smriti Mandhana) आक्रमक फलंदाजी सुरूच राहिली. तिने 45 चेंडूंत 79 धावा करताना तब्बल 7 षटकार आणि 5 चौकार लगावले. मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. शेफालीने 29 चेंडूंत 48 धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर ऋचा घोषने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 22 चेंडूंत नाबाद 49 धावा केल्या. तिच्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रमी स्कोअर

मंधाना, शेफाली आणि ऋचा यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांत 3 बाद 216 धावा उभारल्या. हा आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटमधील विक्रमी संघसंघ आहे.

काही दिवसांतच अनेक विक्रम

मंधानासाठी (Smriti Mandhana) हा विक्रम अचानक आलेला नाही. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध 124 धावांची खेळी करत तिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज म्हणून मिताली राजचा 10,868 धावांचा विक्रम मागे टाकला होता. यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशविरुद्ध 37 धावा करत मंधाना महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. आता 11 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठत (Smriti Mandhana) मंधानाने महिला क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

संबंधित सामग्री

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

Viatina-19 Cow Record: ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oct 06, 2026
हरमनप्रीत कौरने सोडले टीम इंडियाचे कर्णधारपद

हरमनप्रीत कौरने सोडले टीम इंडियाचे कर्णधारपद

Harmanpreet Kaur's captaincy: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचा अंत झाला आहे. अनुभवी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने भारतीय महिला संघाच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय

Oct 06, 2026
शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

शुभमन गिलचा विक्रमी द्विशतक; वनडेमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

Shubman Gill Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावत इतिहास रचला. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग

Oct 01, 2026
शफाली वर्मांने रचला विश्वविक्रम; पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

शफाली वर्मांने रचला विश्वविक्रम; पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

Shafali Verma: पाकिस्तानने दिलेल्या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शफालीने (Shafali Verma) डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावात षटकार..

Sep 07, 2026
ऋषभ पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम!

ऋषभ पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम!

Rishabh Pant Record: श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत मैदानावर पुनरागमन करताच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने विक्रमांची नवी नोंद केली आहे. पंतने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी

Aug 24, 2026