कारंजा (Spouse Harassment Case) : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी २६ मे रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , योगिता जयंत काळे (२५, ह. मु. रामेश्वर जाधव रा. मोहगव्हाण यांनी फिर्यादीत नमुद केले की, तिच्या पतीला दारूचे व्यसन असून, त्याने ४ मे २०२१ ते २५ मार्च २०२४ यादरम्यान नेहमी तिला (Spouse Harassment Case) मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच लग्नातील खाऊचे जमा झालेले पैसे परत घेण्याचा तगादा लावला. मोबाईलवर माहेरी बोलू देत नव्हता. दारू पिऊन त्याने घरातल्या साहित्याची तोडफोड केली आहे.
पतीसोबतच सासू, सासरे, ननंद यांनी देखील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादी महिलेची ननंद देखील घरातल्या कामावरून तिला टोचून बोलते. तसेच गैरअर्जदार पतीला उलटसुलट सांगुन नेहमी संसारात वाद निर्माण करते. याच (Spouse Harassment Case) कारणामुळे फिर्यादी मागील एक वर्षापासून माहेरी गेली होती. अशा आशयाची फिर्याद व समुपदेशन केंद्राच्या लेखी पत्रावरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी आरोपी पती जयंत केशवराव काळे, सासरे केशवराव काळे, सासू कल्पना केशवराव काळे, नंनद स्मिता काळे ( सर्व रा. मौर्या नगर कॉलनी लोहारा चौकी यवतमाळ) व ननंद शिल्पा भांडे (रा.वाशिम) यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ, २९४, ५९४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.