भारतीय स्टेट बँक शाखेची तत्परता!
परभणी (State Bank of India) : परभणीच्या गंगाखेड येथील भारतीय स्टेट बँक (State Bank of India) शाखेचे ग्राहक असलेल्या ग्राहकांचा अपघाती मृत्यु झाल्याने या ग्राहकांच्या वारसाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गतच्या विम्याचे धनादेश (Insurance Checks) वितरित करण्यात आले.
कर्मचारी व ग्राहकांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित!
भारतीय स्टेट बँक गंगाखेड शाखेचे ग्राहक (Customer) असलेल्या गंगाखेड शहरातील रहिवासी वैशाली शंकर भरणे यांचा नुकताच आजारपणामुळे मृत्यू झाला होता तर तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील सविता विठ्ठल कतारे यांचा अपघाती मुत्यु झाला होता. या दोन्ही ग्राहकांच्या वारसांनी याची माहिती भारतीय स्टेट बँकचे गंगाखेड शाखा अधिकारी प्रसेनजीत त्रिभुवन यांना दिली. बँकेच्या सेवा अधिकारी सारिका भडांगे यांनी याची तात्काळ दखल घेत दोन्ही मयत ग्राहकांच्या बचत खात्याची माहिती तपासली असता दोन्ही मयतांच्या बचत खात्यातुन प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत शाखेच्या ग्राहक सेवा केंद्रातून (Customer Service Center) मुंजाभाऊ लोमटे यांच्या मार्फत विमा घेतल्याचे निर्दर्शनास आल्याने बँक अधिकाऱ्यांनी (Bank Officers) याची तत्परतेने दखल घेऊन मयतांच्या वारसांना योग्य ते मार्गदर्शन केले. सेवा अधिकारी सारिका भडांगे यांनी विमा क्लेम रजिस्टर करून घेत त्याचा पाठपुरावा करून बँकेच्या दोन्ही मयत ग्राहकांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये विमा रक्कम मिळवून देत धनादेश वितरित केले. यावेळी बँकेचे अधिकारी अक्षय ढोकर, सेवा अधिकारी सारिका भडांगे, अतुल मेश्राम, बालाजी काळदाते, अजिंक्य खडसे, कमलेश मोरकर, उत्पल मुस्कावार, रुक्मिण हट्टेकर, आत्माराम भुजबळ, मुंजाभाऊ लोमटे, बाळु राठोड, शेषेराव राठोड, शेख साबेर, सय्यद समीर आदींसह कर्मचारी व मयत ग्राहकांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते..
प्रत्येक ग्राहकांने बँकेच्या विमा योजनांचा लाभ घ्यावा- अक्षय ढोकर
आपल्या पश्चात कठीण परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत (Financial Aid) व्हावी यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांनी बँकेत असलेल्या जीवन विमा, अपघाती विमा, आरोग्य विमा कव्हर अशा विविध प्रकारच्या विमा योजनांचा विमा करून घ्यावा असे आवाहन एसबीआयचे अधिकारी अक्षय ढोकर यांनी केले आहे.




