पुसद (State level wrestler) : ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ फुलवाडी द्वारा संचालित स्व. आप्पासाहेब अत्रे विजाभज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा फुलवाडी (Ashram School Phulwadi) च्या 6 कुस्तीपटूंची राज्यस्तरावर विविध वजनी गटात निवड झाली.दि. 10 व 11 ऑक्टोबर रोजी तालुका क्रीडा संकुल पुसद येथे झालेल्या अमरावती विभागीय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले.
कुस्तीतील दबदबा कायम ठेवला.सदर स्पर्धा या क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, तथा यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व यवतमाळ जिल्हा क्रीडा परिषद व पुसद तालुका कुस्तीगीर संघ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद येथील हनुमान व्यायाम आखाडा येथे अमरावती विभाग स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात शाळेच्या 14 वर्षाखालील वयोगटात क्रीश संतोष जयस्वाल38 किलो, नैतिक संतोष पवार 41,रोहिनी प्रेम राठोड 30,रुतुजा रवींद्र राठोड यांनी बाजी मारली तर 17 वर्षाखालील वयोगटात ,साईश्वरी संतोष पवार43,संचिता रवींद्र राठोड46 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत राज्य स्तरा करीता निवड झाली. मागच्या वर्षी शाळेची कुस्तीपटू कु संचिता रवींद्र राठोड हिने राज्यस्तरावर कांस्य पदक प्राप्त केले होते.
मागील पाच वर्षांपासून कुस्ती व विविध प्रकारच्या खेळात शाळेचे विध्यार्थी जिल्हास्तर, विभाग स्तर, राज्यस्तरावर (Ashram School Phulwadi) आश्रम शाळेचे नेतृत्व करतात. विजयी सर्व कुस्तीपटूंचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक चव्हाण, सचिव राजेंद्र चव्हाण,जय बजरंग बली व्यायाम शाळा फुलवाडीचे अध्यक्ष विश्वास पहेलवान मुख्याध्यापक गजानन कलिंदर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.सर्व कुस्ती पटूना शाळेतील क्रीडा शिक्षक ईशान चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.