परभणी (State Marathon Competition) : राष्ट्रपिता म. गांधी जयंती, दुर्गा महोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधुन परभणीत रविवार ६ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक तथा काँग्रेस अनु. जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे (Siddharth Hattambire) यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अॅथलॅटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशन च्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत (State Marathon Competition) ६ किमी अंतराच्या १८ वर्षा आतील मुलांसाठी प्रथम पारितोषिक १०हजार रुपये, व्दितीय ७ हजार रुपये, तृतीय ५ हजार रु., चौथे ३ हजार रु. आणि ५ ते १० व्या क्रमांकांसाठी प्रत्येकी १ हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच १४ ते १६ वर्षाआतील मुलांसाठी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे.२५ सप्टेंबर पर्यंत खेळाडूना ऑनलाईन नोंदणी करता येईल.नोंदणीसाठी रणजित काकडे, प्रा. डॉ. गुरुदास लोकरे, कैलास टेहरे, यमनाजी भाळशंकर, अब्दुल अन्सार, समन्वयक प्रा. डॉ. माधव शेजूळ यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन स्पर्धा आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे (Siddharth Hattambire) यांनी केले आहे.
राज्यस्तरीय खुलागट हाफ मॅरेथॉन स्पर्धा (State Marathon Competition) २१ किमी अंतराची असून पुरुषगट १८ वर्षा पुढील मुले यात सहभागी होतील. प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये. व्दितीय २१हजार रुपये, तृतीय १५ हजार रुपये, चौथा १० हजार रुपये, पाचवा ७ हजार रुपये, सहावे ५ हजार रुपये आणि ७ ते १० क्रमांकांसाठी प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येईल. तसेच राज्यस्तरीय खुलागट) १० किमी अंतराच्या पुरुष गट स्पर्धेत१८ वर्षापुढील मुल मुले सहभागी होतील. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस १५ हजार रुपये, व्दितीय १० हजार, तृतीय ७ हजार, चौथे ५ हजार, पाचवे ३ हजार आणि ६ ते १० व्या क्रमांकांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.