मानोरा (Ramnath Pandey Missing) : तालुक्यातील मौजे कार्ली येथील ९ वीत शिकत असलेला रामनाथ राजू पांडे ( वय १६ वर्ष ) हा विद्यार्थी दि. १० ऑक्टोबर संध्याकाळी पासून बेपत्ता झाला आहे. त्याचा परिसर व नातेवाईक यांच्याकडे कुटुंबीय घेऊनही तो मिळून न आल्याने त्याचा शोध सुरू आहे.
मौजे कारली या गावाचा विद्यार्थी रामनाथ पांडे (Ramnath Pandey Missing) नववीत शिकत शिकत आहे. शुक्रवारी सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने त्याचा कुटुंब नातेवाईकानी इतरत्र ठिकाणी विचारपूस केली असता मिळून न आल्याने बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊन देखील रामनाथ बेपत्ता कुटुंबीय त्याचा शोध घेत असून, कोणालाही आढळल्यास कळविण्याचे आवाहन त्याच्या पालकांनी केले आहे.