अकरावीत एका विषयात मार्क कमी मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
कन्हान (Student suicide Case) : केंद्रीय शाळा कामठी येथे कॉमर्स ११ वी मध्ये असलेला आयुष सुनिल फाये यास एका विषयात कमी गुण मिळाल्याने शिक्षकाने त्याला पालकाला घेऊन आल्यास निकाल मिळेल असे म्हटल्याने आयुषने रात्री ८ वाजता कन्हान नदीवरील जुना ब्रिटिश काळीन पुलावरून नदी पात्रात उडी मारून (Student suicide Case) आत्नहत्या केली.
उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान यांचे राईटर सुनिल फाये यांचा लहान मुलगा आयुष सुनिल फाये वय १७ वर्ष हा केंद्रीय शाळा कामठी येथे ११ वी कॉमर्स शिक्षण घेत असुन सोमवार (दि.२८) एप्रिल २०२५ इयत्ता ११ वी चा विद्यार्थी सायंकाळी ७ वाजता घरा सामोर मित्रासोबत हसत खेळत क्रिकेट खेळला आणि आईला मित्राकडे जातो म्हणुन सायक ल घेऊन निघाला. (Student suicide Case) मुलगा घरी लवकर परत आला नाही. म्हणुन त्याच्या मित्राकडे विचारपुस करण्यात आली.
तेव्हा कन्हान नदीवरील जुना ब्रिटिश काळीन पुलावर आयुषची सायकल पडलेली दिसल्याने नदीत पाहले असता आयुषने पुलावरून शांती घाटाच्या जवळील नदी पात्रात उडी मारून आत्महत्या (Student suicide Case) केल्याचे समजल्याने घटनेची माहिती मिळताच कन्हान, कामठी पोलीस घटनास्थळी पोहचुन कामठी पोलीसाच्या हद्दीत असल्याने कामठी पोलीसानी घटनास्थळाचा पंचनामा करून उशिरा रात्री ग्रामिण उपजिल्हा रूग्णा लय कामठी येथे मुतदेह शवविच्छेदना करिता शीत पेटीत ठेवण्यात आला.
मंगळवार (दि.२९) ला दुपारी २ वाजता आयुष चा मुतदेह शवविच्छेदन करून मिळाल्याने दुपारी ३ वाजता राम नगर कन्हान येथुन आयुष फायेची अंतीम यात्रा काढुन शोकाकुल वातावरणात कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. आयुषला एका विषयात कमी गुण मिळाल्याने शिक्षकांनी त्याला निकाल न देता पालकाला आणल्या वर निकाल मिळेल असे सांगितल्याने आयुष घरी परत आला. आणि भीतीपोटी त्याने कन्हान नदीत उडी घेऊन (Student suicide Case) आत्महत्या केल्याचे बोलल्या जात होते.