मंगरूळपीर(Washim):- मंगरूळपीर तालुक्यातील वाडा फॉर्म येथे 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide)केली. ही घटना 21जून रोजी दुपारी घडली असून, करिश्मा भास्कर लबडे असे मृत (Dead) तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिवनी दलेलपुर येथील करिश्मा लबडे ही युवती तिचे मामा दीपक भिमराव दंदे यांच्याकडे वाडा फार्म येथे आली होती. दरम्यान ,शुक्रवारी २१ जून रोजी दुपारी घरी एकटी असताना तिने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती तरुणीचे मामा दीपक दंदे यांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनला(Police Station) दिली. यावरून पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.