परभणी शहरातील पारवा रेल्वे गेट पुलाजवळील घटना कोतवाली पोलिसात गुन्हा!
परभणी (Suicide) : सासरच्या लोकांकडून होणार्या शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून जीवन जगणे नकोसे झाल्याने एका 23 वर्षीय विवाहितेने रेल्वेखाली येत आत्महत्या केली. ही घटना 28 मे च्या मध्यरात्री घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल!
हाफिजा खान वय 23 वर्ष, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या बाबत मोहम्मद खान यांनी तक्रार दिली आहे. त्यांची मुलगी हाफिजा हिचा विवाह सन 2023 मध्ये फुलबाग कॉलनी येथील आरबाज खान याच्यासोबत झाला होता. काही दिवस चांगले नांदविल्यानंतर, सासरच्या लोकांनी त्रास (Trouble From in-Laws) देण्यास सुरुवात केली. हाफिजाच्या नवर्याने दुसरे लग्न केले. त्यानंतर दुसर्या पत्नीला घरामध्ये ठेवणार, असे म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली. या सततच्या मानसिक, शारीरिक त्रासाला (Physical Trauma) कंटाळून हाफिजा हिने 28 मे च्या मध्यरात्री पारवा गेट पुढील पुलाजवळ रेल्वे (Railway) खाली उडी मारुन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरबाज खान, आय्युब खान, आसिफ खान, आदिला नाहिद यांच्यावर कोतवाली पोलिसात (Kotwali Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. मुजळगेकर करत आहेत.