एक आठवड्यापासून पाण्याची किल्लत; नळांना पाणी नाही
तुमसर (New Water Connection) : शहरातील बहुतांश भागामधील श्रीराम नगरात नळाचे (New Water Connection) नवीन कनेक्शनच्या नादात एका आठवड्यापासून नळांना पाणी नसल्याने पाण्याची किल्लत जाणवत असून जुन्या नळांना पाण्याचा थेंबही येत नसल्याने नागरिकांत हाहाकार होत आहे.
तुमसर शहरातील श्रीराम नगरमध्ये गेल्या आठवड्यापासून कंपनीच्या सुरू असलेल्या कामाने जलवाहिनीला फूट पडल्याने पाणीपुरवठा बंद झाले आहे. या भागातील बहुतांश घरे जुन्या पाईपलाईनवरील कनेक्शनवर (New Water Connection) अवलंबून असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातल्या त्यात महिला व वृध्दांना पिण्याच्या पाण्यासाठी इतर भागात जावे लागत असून नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहे. काही दिवसाअगोदर शहरात एका खाजगी कंपनीचे काम सुरू असताना सदर लाईन फुटल्याची घटना घडली. परंतु या बाबीवर नगर प्रशासन व संबंधित कंपनीच्या दुर्लक्षाने आठवडाभरानंतरही पाणीपुरवठा बंद आहे. दुरुस्तीचे काम मंद गतीने सुरू आहे.
गेल्या आठवड्यापासून श्रीराम नगरमधील नळाचे पाणीपुरवठा बंद आहे. (New Water Connection) नवीन नळ कनेक्शन लावण्याकरीता नगर प्रशासन नागरिकांवर जबराण करीत आहे. ते अजिबात खपवून घेणार नाही.
-प्रमोद तितिरमारे, माजी उपाध्यक्ष