राधेश्याम चांडक यांचा विचारप्रवर्तक सवाल!
आंदोलनकर्त्यांनी भूषण गवईंच्या शांततेचा संदेश समाजात पोहोचवावा!
बुलढाणा (Radheshyam Chandak) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई (Bhushan Gavai) यांच्यावर एका वकिलाने बूट उगारल्याची घटना नुकतीच घडली. या प्रसंगी न्यायमूर्ती गवई यांनी अत्यंत शांतचित्ताने आणि संयम राखत त्या वकिलाला क्षमा केली. त्यांनी “कुठलीही कारवाई करू नका” अशी विनंती करून भगवान गौतम बुद्धांच्या अहिंसा आणि क्षमातत्त्वाचे जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवले.
परंतु या घटनेनंतर देशभर विविध ठिकाणी त्या वकिलावर कठोर कारवाईची मागणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी विचारप्रवर्तक प्रश्न उपस्थित केला आहे. चांडक म्हणाले की, “ज्या न्यायमूर्तींनी स्वतःवर अन्याय झाला तरी क्षमा करण्याची भूमिका घेतली, त्यांच्या नावाने राजकारण करणे हे बुद्धांच्या शिकवणीच्या विरोधात आहे. भूषण गवई यांनी ज्या शांततेचा आणि करुणेचा संदेश दिला, तोच आपल्याला आत्मसात करायला हवा.
भाईजींनी (Radheshyam Chandak) पुढे सांगितले की, गौतम बुद्धांनी ‘क्षमा ही मोठेपणाची ओळख आहे’ हे तत्त्व शिकवले. भूषण गवई (Bhushan Gavai) यांनी त्या तत्त्वाचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करून समाजात आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आणि समाजाने कारवाईची मागणी करण्याऐवजी भूषण गवई यांच्या वर्तनातून प्रेरणा घेऊन शांततेचा, संवादाचा आणि सहिष्णुतेचा मार्ग स्वीकारावा.
राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी (Radheshyam Chandak) यांच्या या वक्तव्याने समाजात सकारात्मक चर्चेला सुरुवात झाली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही गवई (Bhushan Gavai) यांच्या क्षमाशील वृत्तीचे कौतुक करत, ही घटना देशाच्या न्यायव्यवस्थेतील मानवी मूल्यांचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
सामाजिक संदेश :
भूषण गवई यांनी दाखविलेली क्षमा केवळ एका व्यक्तीबद्दल नव्हती, तर ती संपूर्ण समाजासाठी “शांती आणि सहिष्णुतेचा संदेश” होती. अहिंसेच्या या मार्गानेच देशातील वैचारिक संघर्ष मिटू शकतात. हा संदेश आज प्रत्येक नागरिकाने मनात कोरून ठेवावा.. अशी राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) उपाख्य भाईजी यांनी मांडलेली विचारप्रवर्तक भूमिका निश्चितच देणारी आहे एक, सामाजिक संदेश !