T20 worldcup:- ICC T20 विश्वचषक 2024 च्या लीग टप्प्यातील सामने पूर्ण झाले आहेत. आता उद्यापासून सुपर एटचे सामने सुरू होणार आहेत. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा(South Africa) सामना अमेरिकेशी (America) होणार आहे. याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवला गुरुवारी बार्बाडोसमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुखापत झाली आहे. ICC वर्ल्ड T20 रँकिंग नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादव नेट प्रॅक्टिस दरम्यान जखमी थ्रोडाउनचा सामना करताना जखमी झाला.
यावेळी भारताच्या या स्टार क्रिकेटरला खूप वेदना होत असल्याचे दिसले. फिजिओने (physio) त्याला तातडीने उपचार दिले. वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवची दुखापत फारशी गंभीर नव्हती. पेनकिलर स्प्रेनंतर या क्रिकेटपटूने पुन्हा जबाबदारी स्वीकारली आणि फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) दुखापतीनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) तणावात दिसला. या संदर्भात द्रविडने सूर्या आणि फिजिओ या दोघांशीही चर्चा केली असल्याचे समोर आले आहे.