मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
देशोन्नती वृत्तसंकलन
गोंडपीपरी (TB Free India) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरणासाठी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात या मोहीमेंतर्गत जनजागृती वबीसीजी चे लस प्रायोगिक तत्वावर देण्याच्या कामाला सर्वत्र गती आली असून गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी प्राथमिक केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावागावात (TB Free India) राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरं कार्यक्रम राबविण्यात येत असून यात गाव स्तरावर काम करणाऱ्या आशा वारकरी यांचे मोलाचे योगदान असून परिसरातील जनतेनी सहभागी व्हावे, असे आवाहन भंगाराम तळोधी येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. धात्रक (Dr. Dhatrak) यांनी केले आहे.
मार्च एप्रिल २०२४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेअंती प्राथमिक आरोग्य केंद्र भंगाराम तळोधी अंतर्गत २७३५ लाभार्थी आढळून आले असून दि. ४ सप्टेंबर पासून अंतर्गत येणाऱ्या गावा गावात बीसीजी लसीकरणाची काम जोमात सुरू आहे आतापर्यंत ५१६ लाभार्थ्याना लसीकरणाचे डोज देण्यात आले असून पीएससी अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात लसीकरण होणे बाकी आहे. या (TB Free India) मोहिमेची सुरवात भंगाराम तळोधी येथून करण्यात आली.
यावेळी उडघटक म्हणून भंगाराम तळोधी येथील सरपंच बालूगवार यांच्या हस्ते करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. काल रोजी तारसा बुज येथे लसीकरण करण्यात आले. यात शेकडो लाभार्थ्यांनी सदर लसीकरणाचा लाभ घेतला आहे. यात गावागावात कार्यरत असलेल्या आशा वर्कर यांच्या मुळेच हा कार्यक्रम यशस्वी होत असून आशाताईंचे सर्वात मोठे योगदान असल्याचे मत डाँक्टर धात्रक यांनी व्यक्त करीत सर्वेअंती आढळून आलेल्या लाभाराठ्याणी या मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हाहन त्यांनी या वेळी केले.
६० वर्षावरील जेष्ठ नागरिक, मधुमेह व धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती व १८ वर्षावरील व्यक्तीचेबाडी मास इंडेक्स १८ पेक्षा कमी असलेल्याचा आशाच्या माध्यमातून गाव स्तरावर सर्व्ह करून घेण्यात आला होता त्यानुसार दि. ४ सप्टेंबर पासून ही मोहीम हाती घेतली बीसीजी लसीकरण हे अगदी लहान मुलांप्रमाणेच जेष्ठांना सुद्धा दिल्या जात असून याचे कसलेही दुष्परिणाम नसल्याचे डॉ. धात्रक यांनी सांगितले आहे. ही लसीकरण मोहीम साधारणता एक महिना चालणार असून या (TB Free India) क्षयरोग दुरीकरणात ६० वर्षावरील जनतेनी आपापल्या सहमतीने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. धात्रक (Dr. Dhatrak) यांनी केले आहे.