रिसोड दुय्यद निमंत्रक कार्यालयाअंतर्गत येणारे, संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी!
रिसोड (Technical Repairs) : रिसोड नोंदणी विभागाच्या (Registration Department) सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे, दि. 14 ऑगस्ट 2025 रात्रौ 12 वाजल्यापासून ते दि. 17 ऑगस्ट 2025 रात्रौ 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणी सह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद (Ancillary Services Closed) राहतील. तरी रिसोड दुय्यद निमंत्रक कार्यालयाअंतर्गत येणारे संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी. अशी माहिती उदयराज चव्हाण नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकात दिली असल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रभारी बालाजी मदने यांनी कळविले आहे.