कोरची तालुक्यातील घटना
कोरची (Tendupatta laborer Death) : इथून 15 किमी अंतरावर असलेल्या कैमुल येथील जगनलाल सुदाराम मेश्राम वय 53 वर्षे हा आज सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला होता. तीथे त्याला विषारी सापाने चावा घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
सध्या कोरची तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाचा काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिवाची पर्वा न करता लोक जंगलात (Tendupatta laborer Death) तेंदूपत्ता तोडण्यासाठी जात आहेत.कुणी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होत आहे तर कुणाला साप चावून मृत्यू होत आहे. तेंदूपत्ता संकलनापासून त्यांना चांगल्या प्रकारे मजूरी मिळते. या मजूरी च्या पैशातून लोक आपापल्या घरची आर्थिक स्थिती सुधारतात, मुलांच्या शिक्षणासाठी, शेतीसाठी, मुलां मुलींच्या लग्नासाठी किंवा कर्जाची परतफेड करण्यासाठी या पैशाचा वापर करतात. याच हेतूने जगनलाल मेश्राम तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला होता.
जगनलाल जरी मुका आणि बहीरा होता तरी त्याचे डोळ्याचे भाव व हातवारे यावरून सांगितलेली गोष्ट त्याची पत्नी, मुलगा व तीनही मुलींना समजायची.तो अत्यंत मेहनती व शांत स्वभावाचा होता. दरवर्षी तेंदूपत्ता तोडण्यासाठी व घरातील,शेतातील कामे करण्यासाठी त्याची पत्नी व मुले त्याला सहकार्य करायचे.
आज तो सकाळीच जवळच्याच जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेला होता. (Tendupatta laborer Death) तेंदूपत्ता तोडण्यासाठी जसा तो वाकला, त्याच्या पायाला विषारी सापाने चावा घेतला. तो मुका असल्याने आरडाओरड करून कुणाची मदत मागू शकत नव्हता, त्यामुळे तो घाबरलेल्या अवस्थेत घरी आला. आपल्या पत्नीला हातवारे करून साप चावल्याचे सांगितले.पत्नीने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तिथून 15 किमी अंतरावर असलेल्या कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरवले. कैमुल वरून कोरचीला जात असताना वाटेतच तो मरण पावला. वेळीच त्याला योग्य उपचार मिळाले असते तर तो वाचला असता.
जो व्यक्ती बोलू शकत नव्हता परंतु घराला मोठा आधार होता, तो (Tendupatta laborer Death) मरण पावल्यामुळे त्याच्या घरावर मोठे संकट कोसळले आहे. एक शांत आणि कष्टाळू मानसाचा अशाप्रकारे अंत व्हावा हे पाहून सर्वांना वाईट वाटले. या घटनेने पुन्हा एकदा हे सिध्द झाले की, निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचे जीवन किती असुरक्षित आहे.




