परभणीतील पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील घटना पशुधन, अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य जळाले…!
परभणी/पाथरी (Farmer Field Fire) : विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उडालेल्या ठिणग्यांमध्ये आखाड्याला आग लागली. यामध्ये पशुधन, अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही (Farmer Field Fire) घटना पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे २५ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.
बाभळगाव येथे शेख बाबा शेख हसन यांचा आखाडा आहे. मंगळवारी दुपारी अचानक अखाड्याला आग लागली. या (Farmer Field Fire) आगीत दोन बोकडं जळाल्याने मयत झाले. तसेच इतर पशुधनही आगीत होरपळले. आगीमध्ये अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, कोंबडीचे सतरा पिल्ले जळाले. जवळपास ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
आगीमध्ये आखाड्यावरील साहित्य व संसारोपयोगी वस्तू जळून ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या (Farmer Field Fire) नुकसानीची पाहणी करुन पंचनामा करत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेख बाबा शेख हसन यांनी निवेदनाद्वारे पाथरी तहसिलदारांकडे केली आहे. विद्युत वाहिन्यात घर्षण होऊन आगीची घटना घडली. यामध्ये (Farmer Field Fire) शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्याने केली आहे. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही.




