हिंगोली कृउबासचा मोंढा शनिवारपासुन बंद राहणार
हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये व्यापार्यांच्या शेती मालाच्या थप्प्या असल्याने शेतकर्यांचा शेती माल पावसामुळे भिजत आहे. या संदर्भात दैनिक देशोन्नतीमध्ये सचित्र वृत्त प्रसिध्द होताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या संबंधितांना बोलावून खडे बोल सुनावले.
सध्या वादळी वार्यासह पाऊस कोसळत आहे. (Hingoli Bazar Samiti) हिंगोली कृउबासच्या मार्केट यार्डात अनेक व्यापार्यांच्या शेती मालाच्या थप्प्या आहेत. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात शेतकर्यांचा शेतीमाल भिजल्याबाबत दैनिक देशोन्नतीने सचित्र वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची गंभीरतेने दखल मंत्र्यांनी घेतली असुन बाजार समितीच्या यार्डात नियमबाह्य व्यापार्यांच्या शेती मालाच्या थप्प्यांबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा उपनिबंधकासह बाजार समितीच्या संबंधितांना बोलावून बाजार समितीचे लिलाव शेड हे केवळ शेतकर्यांसाठी असुन व्यापार्यांसाठी नसल्याची बाब निर्दशनास आणुन दिली. तसेच व्यापार्यांनी जो शेती माल साठवणुक करून (Hingoli Bazar Samiti) बाजार समितीचे यार्ड व्यापले. त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शेती मालाच्या थप्प्यांबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी खडेबोल सुनावले.
त्यामुळे हिंगोली कृउबास तर्फे व्यापार्यांना तात्काळ शेती मालाच्या थप्प्या उचलून घ्याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे ह्या शेतीमालाच्या संपूर्ण थप्प्या उचलून घेतल्यानंतरच मोंढ्यात खरेदी विक्रीचे व्यवहार चालू ठेवण्याच्या सूचना गुप्ता यांनी दिल्याने (Hingoli Bazar Samiti) बाजार समितीचे सचिव नारायण पाटील २४ मे शनिवार पासुन हिंगोली कृउबास मध्ये शेती माल खरेदी – विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याबाबत शेतकरी, खरेदीदार व हमालांना सूचना केल्या आहेत. एकुणच परिस्थितीमध्ये मोंढ्यातील थप्प्यांबाबत जिल्हाधिकार्यांनी सुनावलेल्या खडेबोलमुळे भविष्यात यार्डामध्ये शेतकर्यांचा शेतीमाल उतरविण्याकरीता पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे.