Parbhani Case :- परभणीच्या सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह (Dead Body)रेल्वे पटरी पासून २० फूट अंतरावर २ मे रोजी सायंकाळी सहा वाजता आढळून आल्याने या तरुणाचे निधन अपघाताने झाले की, घातपाताने याची रवळगाव सह परिसरात चर्चा होत आहे.
घटना परिसरात घातपाताच्या प्रकाराची होतेय चर्चा
याबाबतची समजलेली माहिती याप्रमाणे भागवत मधुकर ढवळे वय ३२ वर्षे राहणार रवळगाव या तरुणाचा मृतदेह सेलू ते सातोना रेल्वे रुळ परिसरात वीस फूट अंतरावर सिद्धार्थ वाडेकर यांच्या शेताजवळ २ मे रोजी सायंकाळी सहा वाजता आढळून आला. घटनेची माहिती पोलीसांना कळल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन पोलीसांनी प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवार ३ मे रोजी डॉ संजय लोया यांनी शवविच्छेदन (Autopsy) केले. दरम्यान मयत तरुणाची आई मागील अनेक वर्षापासून आळंदी येथे राहतात. हा तरुण पत्नी व मुली सोबत रवळगाव येथे वास्तव्यास आहे. मुलाच्या निधनाची माहिती कळल्यानंतर आई गावाकडे रवळगाव येथे आली आहे.
भागवत ढवळे यांच्या निधनाची तक्रार आई अथवा पत्नीने पोलीसात केली नसल्याचे पुढे आले असून सध्या तरी पोलीसांनी गावच्या पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरे वरून कलम १९४ भारतीय न्याय संहिता अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. परंतु गावात रवळगाव येथे वेगळी चर्चा होत आहे. मृतक भागवत ढवळे याचे घातपाताने निधन झाले का अपघाताने हे पोलीस आणि शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होणार आहे. परंतु आई किंवा पत्नी यांच्या तक्रारीनंतर आणि पोलिसांच्या तपासानंतरच भागवत ढवळेच्या मृत्यूचे (Death)खरे कारण पुढे येईल.