Gadchiroli :- सहकार क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजल्या जाणारा महाराष्ट्र राज्य (Maharashtra state) सहकारी पतसंस्था फेडरेशनचा राज्यस्तरीय ‘ दीपस्तंभ पुरस्कार २०२४’ यावर्षी नागपूर विभागातून दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली या पतसंस्थेला मिळाला आहे.
नागरी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा
सदर पुरस्कार नुकताच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्याहस्ते डॅनीसन्स रिसॉर्ट गोकर्ण महाबळेश्वर कुमा कर्नाटक येथे दोन दिवशीय आंतरराज्य सहकार प्रशिक्षण व पुरस्कार वितरण सोहळ्यात पतसंस्थेला प्रदान करण्यात आला. यावेळी कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक डॉ. संजय होसमट, कर्नाटकचे खा. प्रभाकर कोरे, खा. अण्णासाहेब जोले, कर्नाटकच्या आ. शशिकला जोले,सेवानिवृत्त अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर आदी मंचावर उपस्थित होते. हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री , मानद सचिव सुलोचना वाघरे, संचालक दिलीप उरकुडे, शेषराव येलेकर आदींनी उपस्थित राहून स्वीकारला. सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी तसेच प्रामाणिक आणि चोख काम बजावणार्या, सहकारी कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून प्रगती साधणार्या पतसंस्थांना ‘दीपस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. १०० कोटीपेक्षा जास्त ‘ेवी असणार्या पतसंस्था गटातून गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेला (Gadchiroli Urban Cooperative Credit Society) हा पुरस्कार मिळालेला आहे.
गेल्या ३२ वर्षापासून संस्था ग्राहकांना सेवा देत आहे, संस्थेने दिलेल्या सेवेच्या तसेच पारदर्शक व्यवहारामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ग्राहकांचा संस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच ३१ मार्च २०२५ च्या आर्थिक स्थितीनुसार पतसंस्थेने १२६ कोटी ठेवींचा टप्पा गाठला आहे. संस्थेची गुंतवणूक ६६.६३ कोटी असून,१०१.९३ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. वसूल भाग भांडवल ५.८१ कोटी असून राखीव निधी व इतर निधी ३१.५० कोटी एवढा आहे.