माळसेलू येथे पावसाने सोयाबीनच्या नुकसानीची आ. मुटकुळे यांनी केली बांधावर जाऊन पाहणी
हिंगोली (MLA Tanaji Mutkule) : जिल्ह्यात व मागील चार-पाच दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली तालुक्यातील माळसेलु येथे पावसामुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या मोठ्या प्रमाणातील झालेल्या नुकसानीची पाहणी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी 16 सप्टेंबर रोजी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली.
हिंगोली जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापासून अतिवृष्टी होऊन नदी नाल्यांना पूर आले आहेत तर या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीच्या पावसाने हिरावून नेला आहे. हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे शेतकऱ्यांच्या मेहनतीचे हे पीक प्रतिकूल हवामानामुळे व अतिवृष्टीने हानीग्रस्त झालेले पाहून आमदार तानाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांचे मन खिन्न झाले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे आ.मुटकुळे यांनी सांगितले. पावसामुळे झालेले नुकसान भरून निघणार नाही, पण शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी आमदार तानाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी केली आहे.