हिंगोली (Beed MahaElgar Sabha) : बीड येथे १७ ऑक्टोबरला ओबीसी नेते तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने जाण्याचा निर्धार बुधवारी हिंगोलीतील बैठकीत घेण्यात आला.
ओबीसी नेते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत (Beed MahaElgar Sabha) बीड येथे १७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी ५ वाजता महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने पूर्वतयारी म्हणून १५ ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी ४:३० वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीसाठी बापूसाहेब भुजबळ उपाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य, हे प्रमुख मार्गदर्शन केले. वामनराव पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, या बैठकी साठी चंदू लव्हाळे जिल्हा अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद हिंगोली, हकीम भाई, विलास आघाव, जय भगवान महासंघ हिंगोली जिल्हा, गणेश बांगर, विशाल शाहू, पवन मडळे विकी देशमुख, भागवत बोधने, वसंत वाघ, अशोक बम्बरूळे कैलास श्रीनाथ, जयश्रीताई सातव, चदु उबाळे, भागवत घुगे, वैभव आघाव विश्वानंद दराडे, गणेश बोरकर, बालाजी सोनुने, शंकरराव देवकर, सुभाष पोपळघाट, अनिल मस्के, मोहन पोपळघाट, अक्षय लव्हाळे, संग्राम पांडुळे ऋषिकेश लव्हाळे अनिकेत लव्हाळे गणेश रोहित चौधरी, चेतन कोडाने अंकुश कुटे, गणेश बंमरुले, ज्योती दिघडे, आकाश बंमरुले, विजय बंमरुले अनेक ओबीसी समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये पूर्व तयारीची बैठक संपन्न झाली.
समस्त ओबीसी पदाधिकारी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित र राहण्याचा निर्धार केला. (Beed MahaElgar Sabha) बैठकीचे सूत्रसंचलन विशाल साहू यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. रवि थोरात यांनी केले.