परभणी तालुक्यातील नांदखेडा येथील घटना ग्रामीण पोलिसात नोंद
परभणी (Parbhani Suicide Case) : मुलांचे कसे होईल या विचारात मानसीक त्रास घेऊन लहान लेकरांच्या बांधलेल्या झोक्याच्या दोरीने आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २० एप्रिल रोजी सकाळी परभणी तालुक्यातील नांदखेडा येथे घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शंकर सावळे यांनी खबर दिली आहे. त्यांच्या बहिण यशोदा गणेश आगलावे यांनी (Parbhani Suicide Case) आत्महत्या केली. यशोदा यांना तीन लेकर असून पती मजुरीचे काम करत होता. लेकरांचे कसे होईल या विचाराने मानसीक त्रास घेऊन घरातील लहान लेकराच्या बांधलेल्या झोक्याच्या दोरीने यशोदा यांनी गळफास घेत आत्महत्या केली. तपास सपोउपनि. कादरी करत आहेत.
तरुणाने घरात घेतला गळफास
परभणी : राहत्या घरात पत्राच्या खाली असलेल्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने (Parbhani Suicide Case) गळफास घेऊन २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना २० एप्रिल रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास कालाबावर परिसरात उघडकीस आली. मो. अजरोद्दीन अब्दुल अजीज रंगरेज असे मयताचे नाव आहे. मो. अब्दुल अजीज यांच्या खबरीवरुन नानलपेठ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ना. चव्हाण करत आहेत.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास
परभणी : माझ्या बहिणीच्या व माझ्या लेकरांचे कसे होईल या विचारात एका ३६ वर्षीय इसमाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने (Parbhani Suicide Case) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २० एप्रिल रोजी सकाळी साडेगाव येथे उघडकीस आली. भगवान उर्फ भागवत माणिकराव पवार (वय ३६ वर्ष) असे मयताचे नाव आहे. जयश्री पवार यांच्या खबरीवरुन ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ह. बुकरे करत आहेत.