Yawatmal :- जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणार्या पोलिसांच्या पोलीस ठाण्याचीच (Police station)मोठी दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या वर्षभर्यापासून पडक्या झोपडीसारख्या पडक्या शेडमध्ये वडगाव जंगल पोलीस ठाण्याचा कारभार सुरु आहे. याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल. एकूणच इमारत बांधकामाचा मुहूर्त कधी निघणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इमारत बांधकामाचा मुहूर्त कधी निघणार
वडगाव जंगल पोलीस ठाण्याची सन १९३६ मध्ये स्थापना झाली. या काळामध्ये पोलीस स्टेशन साध्या रुपात बांधण्यात आले. त्यानंतरच्या दरम्यान २०२४ पर्यंत ठाण्याची इमारत जवळपास सुरळीत अशा अवस्थेत होती. गेल्यावर्षी बरसलेल्या धुवादार पावसामुळे तसेच वादळामुळे पोलीस ठाण्याचे छप्पर उडाले. नव्हेतर ठाण्याचे पूर्णच चित्र पालटून गेले. सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहाणी टळली. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ उपाययोजना तसेच पर्यायी व्यवस्था करून देणे अपेक्षीत होते. मात्र, असे काहीच झाले नाही. उलट पडक्या इमारतीत आजही पोलीस कर्मचारी समोरील शेडमध्ये बसतात. याच पडक्या शेडमध्ये तक्रारी नोंदविल्या जाते, असे विदारक चित्र आज घडील उमटून येत आहे. पोलीस खाते हे शिस्तबद्ध खाते म्हणून ओळखल्या जाते. ज्या पोलीस ठाण्यात ८ ते १० घंट्यांची नोकरी पोलिसांना करावी लागते. ते ठाणे पडक्या अवस्थेत असल्यामुळे पोलिसांची मानसिकता ढासळत चालली आहे.
काही महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या सीसीटीएनएसच्या खोलीमध्ये सर्व ठाण्याचा कारभार त्यांना करावा लागतो
ठाण्यात नुकत्याच काही महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या सीसीटीएनएसच्या खोलीमध्ये सर्व ठाण्याचा कारभार त्यांना करावा लागतो. ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना जीव मुठीत धरून ड्युटी करावी लागत आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनची बैठक झाली. या बैठकीत वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारत बांधकामाबंद्दल चर्चासत्र तसेच निर्णय घेणे अपेक्षीत होते. आज घडीला पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे. एकूणच आता पालकमंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकार्यांना विचार मंथनाची वेळ निर्माण झाली आहे