गावकऱ्यांनी मानले केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव याचे आभार!
बुलढाणा (Prataprao Jadhav) : गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेल्या पेनटाकळी पुनर्वसन प्रकल्पाचा अखेर निर्णायक निकाल लागला असून, मौजे पेनटाकळी गावातील ४०१ नागरिकांना हक्काचे प्लॉटचे वितरण केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्याहस्ते करण्यात आले.
१९९८ पासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन प्रश्नासाठी गावकऱ्यांनी १२ दिवस प्रकल्पाच्या काठावर गावठाण हद्दवाढीसाठी उपोषण केले होते. केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मागील अनेक वर्षे पासून लक्ष घालून प्रशासकीय पातळीवर व मंत्रालय मुंबई येथे पाठपुरावा केला. शासनाच्या मान्यतेनंतर ७ हेक्टर ८२ आर जागेवर एकूण ४०१ भूखंड तयार करण्यात आले. नियोजित आराखड्यानुसार समाजनिहाय या प्लॉट्सचे वाटप गावकऱ्यांना करण्यात आले असून, ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी स्वतः गावात जाऊन लाभार्थ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला व समस्या दूर केल्या आहेत.
या कार्यक्रमाला आ. सिद्धार्थ खरात, तहसीलदार निलेश मडके, सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एम.जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, विस्तार अधिकारी शिवाजी पंडागळे, मंडळ अधिकारी गजानन ढोके, तलाठी सागर जायगुडे, ग्रा.पं.अधिकारी डी.बी.काळे, मोहन मगर, गजानन लहाने, जी.पी.मवाळ, संरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी, शिवसेनेचे पंजाबराव इंगळे, पुंजाजी इंगळे, भुंजगराव इंगळे, संतोष डुकरे, अमोल म्हस्के, सरपंच, ग्रामस्थ व प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, हे स्वप्न या माध्यमातून साकार होणार आहे. केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश येऊन गावकऱ्यांच्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीत मोलाची भर पडली आहे.