बुधवार दुपारची घटना अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
परभणी (Nava Mondha Police) : येथील नवा मोंढा पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या सुपर मार्केट परिसरातून अज्ञात चोरट्याने एसीचे आऊट डोअर मशीन मधील तांब्याची तार असे ८ हजार ८०० रुपयांचे साहित्य चोरुन नेले. ही घटना २६ मार्चच्या दुपारी तीनच्या सुमारास घडली. या (Nava Mondha Police) प्रकरणी नवा मोंढा पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांना ठाण्याचीही भीती राहिली नाही..!
शशिकांत हत्तीअंबीरे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या चुलते भिमराव हत्तीअंबीरे यांचे सुपर मार्केट परिसरात गाळा आहे. हा गाळा सध्या शशिकांत यांच्या ताब्यात आहे. या ठिकाणी एसी बसविला आहे. एसीच्या आऊटडोअर मशीन कापून त्यातून १६ फुट तांब्याची तार आणि साठ फुट केबल अज्ञात चोरट्याने लंपास केले. घडला प्रकार लक्षात आल्यावर नवा मोंढा पोलिसात तक्रार देण्यात आली. Nava Mondha Police) पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी चोरी झाली आहे. मागील काही दिवसात सदर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे दिसत आहे.