वसमत (Hingoli) :- वसमत येथील बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील साडेपाच तोळ्याचे दागिने चोरट्याने लांबवल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात (Police station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे लग्नसराईच्या गर्दीच्या काळात सुद्धा बसस्थानकात पोलीस फिरकत नाहीत बसस्थानकात असलेल्या पोलीस चौकीत पोलीस थांबत नाहीत बसस्थानकात सीसीटीवी नाहीत त्यामुळे चोरट्यांना रान मोकळे झाले आहे
वसमत बसस्थानकात लग्नसराईमुळे प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे या गर्दीचा फायदा भुरटे चोर व टवाळखोर घेत आहेत महिलांचे दागिने लांबवण्याचा प्रकार शुक्रवारी घडला वसमत येथील बस स्थानकातून वसमत औंढा एसटीत चढत असताना महिलेच्या पर्समध्ये असलेले साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने (Gold armaments) चोरट्याने लांबवले याप्रकरणी सुमित्रा संदिप पिंपरकर, रा परभणी यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चोरट्याने पर्समधील दागिने काढून घेतल्याचे नमूद
यात सकाळी अकराच्या सुमारास बस मध्ये चढत असताना चोरट्याने पर्समधील दागिने काढून घेतल्याचे नमूद केले आहे. यामध्ये 34 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण,11 ग्राम वजनाचा नेकलेस , 08 ग्राम वजनाचे झुंबर असा एकुण 2 लाख 65 हजार रु. चा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याचे नमूद केले आहे या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील फिर्यादी महिला ही वसमत तालुक्यातील सेलु या गावी जाण्यासाठी वसमत औंढा बसमध्ये चढत असतांना तिच्या खांद्याला असलेल्या बँग मधील सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्याने लांबवले या घटनेने खळबळ उडाली आहे प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन करत आहेत