परभणी (Parbhani) :- शेतातील कापसाला खत घालणे व खुरपणी करण्यासाठी गेलेल्या शेतकर्याचे घर भरदिवसा फोडण्यात आले. चोरट्यांनी घरातून रोख २५ हजार आणि सोन्याचे दागिने मिळून ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवार ३० जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या दरम्यान परभणी तालुक्यातील उजळंबा येथे घडली. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरामध्ये जावून पाहणी केली असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त झालेले दिसले
गजानन महादू साखरे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीची उजळंबा शिवारात शेती आहे. ते मंगळवारी सकाळी पत्नीसोबत शेतातील कामासाठी गेले होते. सायंकाळी घरी आल्यावर त्यांना घराच्या चॅनल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. घरामध्ये जावून पाहणी केली असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख २५ हजार रुपये, ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold ornaments)चोरुन नेले. या प्रकरणी दैठणा पोलिसात सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.