विकास कामांसाठी आपण निमित्तमात्र, कर्ता भोलेनाथच : जालिंदर बुधवत
बुलढाणा (Srikshetra Budhaneshwar) : प्राचीन मंदिर आणि अध्यात्मिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या (Srikshetra Budhaneshwar) श्रीक्षेत्र बुधनेश्वर संस्थान मढ येथील महादेव मंदिर परिसरात पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी कीर्तन सेवा दिली. परिसरात झालेली विकास कामे ही भोलेनाथाचीच कृपा आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत. यापुढेही आपल्याकडून जे चांगले काम होईल ते करण्याचा मानस यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला.

श्री क्षेत्र बुधनेश्वर महादेव संस्थान मढ ता.जि. बुलढाणा येथे सालाबादप्रमाणे २८/७/२०२५ रोजी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर (माऊली) महाराज शेलुदकर यांच्या कीर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन जालिंदर बुधवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आयोजन केले होते.
यावेळी शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके (Jayshreetai Shelke) , जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कमलताई बुधवत , जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके , पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर आघाव, उपजिल्हाप्रमु लखन गाडेकर, तालुका प्रमुख विजय इतवारे, अशोक गव्हाणे, समाधान बुधवत आणि मढ येथील मंदिराचे विश्वस्त मंडळी तसेच परिसरातील सेवाधारी उपस्थित होते. पैनगंगेचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणारे प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असे मढ येथील बुधनेश्वर महादेव मंदिराची ओळख आहे. श्रावण महिन्यात अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येथे येत असतात. महाप्रसाद कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती होती.




