हिंगोलीत तीन दिवसीय योग शिबिराचा समारोप
हिंगोली (Hingoli Yoga Camp) : योग आयुर्वेद व स्वदेशीसह नशा मुक्त जीवन,विषमुक्त शेती भारताला गत वैभव प्राप्त करून देऊ शकते असे प्रतिपादन योग शिबिराच्या समारोप प्रसंगी पतंजली योग पिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थ देव यांनी केले.
हिंगोलीत आयोजित (Hingoli Yoga Camp) तीन दिवसाच्या समारोपीय योग शिबिरामध्ये उपस्थितांकडून योगासने, प्राणायाम सूर्यनमस्कार सूक्ष्म व्यायाम आदीचे प्रात्यक्षिक करून घेत ते बोलत होते. सकाळी पाच वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची शुभेच्छा पत्नी सीमा लोहिया, पतंजली योग पिठाचे अजीव सदस्य कुंडलिकराव निर्मले, संजय नाईक,तानाजी दासूद, मन्मथ गुमटे, ज्ञानदेव गुठ्ठे,विठ्ठल सोळंके, प्रमोद देशपांडे, महिला पतंजली योग समितीच्या प्रांत सदस्य माधुरी शास्त्री, महामंत्री शितल तापडिया, सहाय्यक सरकारी अभियोग्यता ज्ञानेश्वर गिरी आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने योग शिबिराची सुरुवात झाली.
महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात हजारो महिला कॅन्सर संशयग्रस्त आढळल्याचा धागा पकडून पंजाब, मध्य प्रदेश या गहू पिकवणार्या राज्यामध्ये रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने अन्नातून कॅन्सर निर्मिती होत असल्याचे ते म्हणाले. (Hingoli Yoga Camp) योग शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या साधकांमुळे हिंगोली जिल्ह्यात वाढत असलेल्या आरोग्याप्रती जागृतीचे देखील त्यांनी कौतुक केले. भविष्यात स्वामी रामदेव जी महाराज यांच्या उपस्थितीत मोठ्या शिबिराची तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पतंजलीच्या भारत स्वाभिमानचे प्रांत अध्यक्ष दिनेश राठोड यांनी या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थितांचे व शिबिरासाठी आयोजना साठी मदत करणार्या सर्वांचे आभार मानले.
शहरांमध्ये विविध ठिकाणी चालू असलेल्या नि:शुल्क योग वर्गामधून योगाभ्यास करून (Hingoli Yoga Camp) जागतिक योग दिन देखील याच उत्साहाने साजरा करावा असे आवाहन त्यांनी उपस्थिती त्यांना केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पतंजली योग समितीचे अशोक पवार, बालासाहेब हरण, राजकुमार टिळे, उमेश तोष्णीवाल, प्रणत अग्रवाल, आशिष जयस्वाल, रमेश काळे, बाबुराव पारस्कर, ऍड.एकनाथ बांगर, ज्योती वाघमारे, अनंत जाधव, विलास काळे, प्रकाश देशमुख, गंगाधर सरकटे, संजय नाईक, डॉ.संतोष कल्याणकर, बालासाहेब जाधव, जनक कदम, अरविंद जाधव, दीपा जांगिड, गजानन खंदारे आदीसह जिल्ह्यातील सर्व पतंजली योग परिवारातील पदाधिकारी व साधकांनी परिश्रम घेतले.




