स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, तीन इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली (Wasmat Crime Case) : वसमत शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध माहिती काढून कार्यवाही करण्याबाबत (Wasmat Crime Case) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत शहरात पेट्रोलिंग करीत असताना प्रसाद मंगल कार्यालय वसमत येथे काही मुले तलवार घेऊन फिरत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सदर इसमांस तलवारी सह पकडले असता कृष्णा वैजनाथ कावळे, संतोष प्रकाश कावळे, दादाराव गोविंद कावळे सर्व राहणार नागापूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली असे नावे त्यांनी सांगितले. या (Wasmat Crime Case) तिघांनाही धारदार तलवार व मोटार सायकल सह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन वसमत शहर येथे भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही प्र. पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली (Wasmat Crime Case) स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे ,गजानन पोकळे,आकाश टापरे, आझम प्यारेवाले, साईनाथ कंठे,नरेंद्र साळवे , शेख नय्यर यांच्या पथकाने केली आहे.