सावरगाव/ तळोधी (बा.) (Chandrapur) :- तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील वाढोणा व गंगासागर हेट्टी येथील दोन नागरिकांचा बळी घेणार्या पट्टेदार वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या भागात वाघाची मोठी दहशत पसरली होती.
वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने मोठी मोहीम हाती घेतली
वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने मोठी मोहीम हाती घेतली होती. अखेर तळोधी वनपरिक्षेत्रातील (Forest area) सावरला दरम्यान वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील टीएटीआर-२२४ पट्टेदार वाघ (वय अंदाजे ८ वर्ष) हा वाढोना, गंगासागरहेट्टी या परिसरात सैरभैर फिरत होता. अनेकांना दिवसाढवळ्या गावाशेजारी त्याचे दर्शन होत होते. त्यामुळे परिसरातील नागरिक तेंदुपत्ता व मोहफुल यावर रोजगाराचे साधन म्हणून उपजीविका करणारे भयभीत झाले होते व यातच दोघांचा बळीही या वाघाने घेतला होता. त्यामुळे या वाघाला जेरबंद करणे अनिवार्य होते. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांचे मार्गदर्शनात ठीक ठिकाणी कॅमेरे लावून त्याचे मागावर राहून ५ दिवसापासून त्याचा ठावठिकाण घेत होते. शेवटी आज गंगासागर हेटी बीटातील सावरला रिट भु.क्र.२. येथे सकाळी ११.३० चे दरम्यान सापळा रचून पकडण्यात आले, त्यानंतर सावरगाव येथील वन विभागाच्या डेपोमध्ये ठेवण्यात आले.
नरक्षक पीआरटी सदस्य वनमजूर यांनी विशेष परिश्रम घेतले
त्यानंतर लोकांचा जमाव वाढत असल्याने तात्काळ त्याला गोरेवाडा नागपूर येथे पाठविण्यात आले. यात उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, प्रादेशिक वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक ब्रह्मपुरी राकेश आहुजा बायोलॉजिस्ट ब्रह्मपुरी, डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव ) ता. अ. व्या. प्र. चंद्रपूर, हे जातीने लक्ष ठेवून होते. तसेच अजय मराठे पोलीस हवालदार (shooter) यांनी मोठ्या शिताफीने वाघाला पकडण्यात यश मिळविले. यात तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात अरविंद माने क्षेत्र सहाय्यक तळोधी, राजेंद्र भरणे क्षेत्रसहाय्यक आकापूर, घनश्याम लोणबले वनरक्षक देवपायली, पंडित मेकेवाड वनरक्षक आलेवाही, यश कायरकर अध्यक्ष स्व्याब फाउंडेशन, जीवेश सयाम यांच्यासह स्व्याब चे बचावदल प्रमुख आर.आर.टी. व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील वनरक्षक पीआरटी सदस्य वनमजूर यांनी विशेष परिश्रम घेतले.