वाशिम (Malegaon police) : अकोला ते मेडशी रोडवर वाकळवाडी बस थांब्याजवळ दोन इसम हे गांजा बाळगताना व वाहतूक करताना मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . ही घटना १९ मे च्या रात्री ९ ते १०-३० वाजताच्या दरम्यान घडली.
यातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक संतोष हिंगे पोलीस स्टेशन मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १९ मे २०२५ चे सायंकाळी ९ ते १०-३० वाजता च्या दरम्यान दोन इसम हे गांजा सदृश पदार्थ स्वतःचे कब्जात बेकायदेशीररित्या बाळगताना व वाहतूक करताना अकोला ते मेडशी रोडवरुन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यावरून त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे असलेल्या एका पांढर्या रंगाच्या बोरीमध्ये गांजा सदृश अमली पदार्थ वजन ११ किलो ४२० ग्रॅम तसेच दोन गांजा सदृश्य मुद्देमालाचे सॅम्पल प्रत्येकी ४० ग्रॅम असे एकूण ११ किलो ५०० ग्रॅम गांजा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
तसेच इतर साहीत्य ३०० रुपये असा एकूण १ लाख ३८ हजार ३०२ रुपयांचा मुद्देमाल मालेगाव पोलिसांनी जप्त केला असून आरोपी अभिषेक गजानन ठाकरे वय २द वर्ष रा हनवतखेडा ता मालेगांव व एक ६० वर्षीय महिला राहणार खेर्डा तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या वर कलम ८ (क ) २० एनपीएस अॅक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप रहाटे हे करीत आहेत.