हळद उत्पादक शेतकरी हित जोपासण्यासाठी सदरील प्रकल्प पूर्णत्वासाठी सर्वतोपरी मदत!
हिंगोली (Turmeric Farming) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (Turmeric) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत येथे आकार घेत असून, या माध्यमातून हळद उत्पादक शेतकरी हित जोपासण्यासाठी सदरील प्रकल्प पूर्णत्वासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (Minister of State Adv. Ashish Jaiswal) यांनी सांगितले.
संशोधन केंद्राच्या सुरवातीपासून आजपर्यंतच्या संपूर्ण वाटचालीबाबत विस्तृत माहिती!
वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री ना. ॲड. श्री आशिष जयस्वाल यांनी दि. 29 मे 2025 रोजी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (Turmeric) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे भेट दिली. याप्रसंगी संशोधन केंद्राचे अध्यक्ष मा. ना. श्री हेमंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. संशोधन केंद्राच्या परिसरात सुरू असलेल्या संपूर्ण कामांची पाहणी मंत्री महोदयांनी केली. संशोधन केंद्राच्या सुरवातीपासून आजपर्यंतच्या संपूर्ण वाटचालीबाबत विस्तृत माहिती अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयांना दिली.
या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार!
या भागात मोठ्या प्रमाणावर लागवड असलेल्या हळदीसाठी संशोधन केंद्राची उभारणी किती महत्त्वाची आहे, हे सांगितले. हिंगोली सारख्या औद्योगिक क्षेत्रात मागासलेल्या भागात या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून, हळद उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. हळद प्रक्रियेसाठी लागणारे इंधन व त्यातून होणारी वृक्षतोड यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. संशोधन केंद्रातील प्रक्रिया प्रकल्पामुळे आगामी काळात वृक्षतोड होणार नाही व पर्यावरण संवर्धन होईल. “वसमत हळद” या नावाने भौगोलिक मानांकन, जागतिक हळद परिषदेचे आयोजन, खरेदी विक्री संमेलन, हळद निर्यात धोरण आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. संशोधन केंद्राच्या (Research Center) वतीने विविध हळद वाणांची रोपे तयार करण्यात येत आहेत. त्या रोपांची पाहणी करून मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले.
संशोधन केंद्राचे तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांनी पीपीटीद्वारे मंत्री महोदयांना माहिती दिली!
संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम (Research Center Managing Director Rajendra Kadam) यांनी उपलब्ध निधीतून हाती घेण्यात आलेल्या विविध कामांची व खर्चाची माहिती दिली. सदरील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीबाबत माहिती दिली. संशोधन केंद्राचे तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांनी पीपीटीद्वारे मंत्री महोदयांना माहिती दिली. मंत्री महोदयांनी संशोधन केंद्राला भेट देत भरपूर वेळ दिला. सर्व माहिती जाणून घेत, संशोधन केंद्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल व गरजेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल. हळद उत्पादक शेतकरी (Turmeric Farmers) हितासाठी जे-जे करणे गरजेचे आहे, ते सर्व आम्ही करू असे आश्वासन मंत्री महोदय (Mr. Minister) जयस्वाल यांनी दिले.
पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती!
यावेळी विकास माने उपविभागीय अधिकारी वसमत, सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. दिगांबर बडगुजर, डॉ. पवन डोके तालुका कृषी अधिकारी, सुनील भिसे, गणेश कोरेवाड, संशोधन केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी , तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह हर्ष कंन्श्ट्रकशनचे अभियंता, कर्मचारी यांची उपस्थिती होती. आनंद भरोसे, विशाल कदम यांच्यासह पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थित होती.