हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती संत नामदेव हळद मार्केट मधील मागील काही दिवसापूर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते. तब्बल दहाव्या दिवशी २ सप्टेंबरला (Hingoli Bazar Samiti) हळदीची खरेदी विक्री पुर्ववत सुरू झाली. हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात २ सप्टेंबर मंगळवार रोजी हळदीची १ हजार ४०० क्विंटल आवक झाली होती. हळदीला १० हजार ६५० ते ११ हजार ७०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला.
सलग सुट्यानंतर मंगळवारी येथील मोंढा सुरू झाला हळद उत्पादक शेतकर्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती. १ हजार ४०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. हळदीला १० हजार ६५० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. (Hingoli Bazar Samiti) हळदीच्या भावात मागील काही दिवसापासून घसरण सुरू आहे. बारा हजार रुपये क्विंटल वरुन हळदीचे दर कमी होत सद्यस्थितीत साडेदहा हजार रुपयापर्यत आले आहेत. अनेक हळद उत्पादक शेतकर्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने हळद विक्रीसाठी ठेवली होती. आता मात्र भाव चांगलेच घसरले असल्याचे हळद उत्पादक शेतकरी सांगत आहेत. (Hingoli Bazar Samiti) हळदीला दर कमी मिळाल्याने शेतकरी निराश आहेत.




