देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ettapalli : टस्कर हत्तींची आता एटापल्ली तालुक्यातही धडक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Ettapalli : टस्कर हत्तींची आता एटापल्ली तालुक्यातही धडक
विदर्भगडचिरोली

Ettapalli : टस्कर हत्तींची आता एटापल्ली तालुक्यातही धडक

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/12 at 11:31 AM
By Deshonnati Digital Published August 12, 2025
Share

Ettapalli :- गेल्या काही दिवसांपासून  कोरचीपासून गडचिरोली, चामोर्शी  तालुक्यात थैमान घालणार्‍या टस्कर हत्तींनी आता आपला मोर्चा एटापल्ली तालुक्याकडे वळविला आहे. जारावंडीपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर, छत्तीसगड सीमेलगत असलेल्या मंजिगड टोल्यात  ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास या  टस्कर हत्तींनी  गावात घुसून घरांची तोडफोड केली.यामुळे एटापल्ली तालुक्यात रानटी हत्तींची दहशत निर्माण झाली आहे.

मंजिगड टोल्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ, घरांची तोडफोड

रानटी हत्तींनी  मंजिगड गावातील रिझनसाय खलको यांच्या घरावर हल्ला केला. हत्तीने घराचे छप्पर पाडले, भिंतींना भगदाड पाडले, घरातील मोबाईल फोडला, भांडी, धान आणि घरातील आवश्यक वस्तूंचे नुकसान केले. या हल्ल्यात कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले असून भर पावसात घराचे छप्पर आणि भिंती उध्वस्त झाल्याने संपूर्ण कुटुंब बेघर झाले आहे. भर पावसाच्या काळात छप्पर नसलेल्या घरात राहणे अशक्य झाल्याने कुटुंबाला उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. ‘राहायचं कुठे? संसार थाटायचा कुठे?’ असा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा हत्ती मागील काही दिवसांपासून सतत भाग बदलत आहे. कधी चामोर्शी परिसर, तर कधी गडचिरोलीकडे जाऊन पुन्हा एटापल्ली तालुक्यात दाखल झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागाकडून (Forest Department) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संध्याकाळी व रात्री जंगलाच्या दिशेने न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हत्तीचा वावर दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित शेतकरी रिझनसाय खलको यांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. घर, संसार आणि पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने त्वरीत मदत करावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

You Might Also Like

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

TAGGED: forest department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Sand Smuggling
हिंगोलीमराठवाडा

Sand Smuggling: धार शिवारात 4 ट्रॅक्टर हेडसह किनी यंत्र व वाळू तस्करी करणारे 2 वाहने पकडली!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 1, 2025
Tiger Attack: राजूर शिवारात वाघाच्या हल्ल्यात मजूर जखमी
Gadchiroli: माविमच्या सुसंकल्प गटाची व्यवसाय कडे वाटचाल
MLA Rajesh Bakane: अतिक्रमण पट्टे नियमबद्ध करण्याचे व आपत्ती व्यवस्थापनास सज्ज राहण्याचे निर्देश
Parbhani: नागरिकांच्या उन्हापासुन बचावासाठी महानगरपालिका सज्ज
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?