Parbhani :- (CM Laadki Bahin Yojna)माझी लाडकी बहिण योजनेसाठी महिलांना स्वत:चे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नारीशक्तीदूत अॅपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल किंवा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्यास ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जाचा नमुना व हमीपत्र अॅपवर उपलब्ध आहे. अर्जाची प्रिंट काढून अर्ज, हमीपत्र भरावे, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे द्यावे. अर्जाचा विहित नमुना ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी येथे उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.