भंडारा (Scooty-Car Accident) : नागपूर-रायपूर महामार्गावरील पुराना आरटीओ रोड बैल बाजारा जवळील (भिलेवाडा) येथे स्कुटी व कारचा अपघात (Scooty-Car Accident) दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दि.१९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.५० वाजताच्या दरम्यान घडली.
अपघात (Scooty-Car Accident) घडताच राकेश बांते यांच्या मोबाईलवरून माहिती मिळताच घटनास्थळी पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र २४ तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली.
जखमीमध्ये आलोक मनोज गजभिये (१९) रा.आंबेडकर वार्ड, कारधा, कृतिका शेंडे (१९) रा.कारधा हे स्कुटी क्र.एम.एच.३६/ए.ई.२८३३ ने भिलेवाड्यावरून कारधाकडे येत असताना समोरून येणारी मारुती स्विफ्ट क्र.एम.एच.३६/ए.आर.२१९२ ला बैल बाजाराजवळ धडक दिल्याने अपघात घडला. सदर अपघातात जखमी झालेले आलोक व कृतिका यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.