ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रेफर करण्यात आले!
कोरची (Brain Malaria) : आज ग्रामीण रुग्णालय कोरची (Rural Hospital Korchi) येथे ब्रेन मलेरिया ने पहिला बळी गेल्यामुळे कोरची तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. कोरची तालुका मुख्यालयापासून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमली येथील भगवानसिंग फुलसिंग करसी वय 70 वर्ष यांना काल 4 जुलैला सकाळी अचानक थंडी वाटू लागली, म्हणून त्यांच्या मुलांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बेडगाव (Primary Health Sub Center Bedgaon) येथे तपासणी करीता नेले असता, त्यांचा तपासणी दरम्यान, मलेरिया प्लासमोडियम फॉलसिफेरम (PF) चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रेफर करण्यात आले. दुपारी 12 वाजता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे त्यांना भरती करून त्यांच्यावर मलेरियाचे उपचार करण्यात आले. परंतु त्यांना ब्रेन मलेरिया (Brain Malaria) झाल्यामुळे त्यांचा आज सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
मागील 4 दिवसात ग्रामीण रुग्णालयात 10 रुग्ण पॉझिटिव्ह!
सध्या मलेरियाचा प्रकोप तालुक्यात वाढत असून, सध्या कोरची येथील ग्रामीण रुग्णालय येथे मागील 4 दिवसात मलेरियाचे 10 रुग्ण भरती करण्यात आले असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
कोट
भगवानसिंग करसी या रुग्णाचा मलेरिया अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून, त्यांना रक्तदाबाचा सुद्धा त्रास होता व ब्रेन मलेरिया झाल्यामुळे भगवान सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डॉ. अनिकेत राऊत
वैध्यकीय अधिकारी
ग्रामीण रुग्णालय, कोरची