१ हजार २४२ ग्रामस्थांची तपासणी
अकोला (Typhoid fever) : पातुर तालुक्यातील चातारी येथील ग्रामीण रुग्णालयात विषमज्वर चाचणीत रुग्ण बाधीत आढळुन आल्याने चतारी येथे विषमज्वर आजाराचा उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. (Typhoid fever) उद्रेक प्रतिबंध संदर्भाने जिल्हास्तरीय पथक व तालुका स्तरीय पथकाने प्रत्यक्ष चतारी येथे जावुन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कार्यवाही अंमलात आणण्याचे अनुषंगिक कार्यवाही केली.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी चार सर्व्हे पथकांकडून ४२६ घरांची तसेच बुधवारी २६३ घरांची तपासणी करण्यात आली. चातारीची एकुण लोकसंख्या २ हजार ३०० एवढी असून आतापर्यंत तपासणी केलेल्यांची संख्या १ हजार २४२ आहे. ’ओपीडी’ रुग्णांची संख्या ३ एवढी असून त्यामध्ये ताप, मळमळ, पोटदुखी, (Typhoid fever) डोकेदुखी ओपीडीमधील (Rural Hospital) रुग्णांची संख्या १३ असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५ आहे तर उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या ३ आहे. पथकाने १३ रक्त जल नमुने घेतले असून त्यापैकी रक्त जल नमुने विडॉल (विषमज्वर) करीता बाधीत आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० एवढी आहे.
विषमज्वर उद्रेक (Typhoid fever) जाहिर झाल्याने वैद्यकीय अधिकारी १, समुदाय आरोग्य अधिकारी १, आरोग्य सहाय्यक-१, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका ७ आहे. चार पथकांमार्फत चतारी गावातील घरोघरी जाऊन सर्वे करीत आहे. तसेच पिण्याचे पाणी उकळुन व आरओ पाण्याचा वापर, विलगीकरण कक्ष व संदर्भ सेवा, सद्यस्थितीचा सर्वेक्षाण करण्यात येत असून (Rural Hospital) ग्रामीण रूग्णालयात रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा साथरोग तज्ञ, फिजीशियन व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने मौजे चतारी येथे भेट देवून संबधीत अधिकारी व कर्मचारी यांना साथ नियंत्रणासाठी सुचना दिल्यात. जिल्हाधिकार्यांनी उद्रेकाची माहिती घेवून परिस्थीती नियंत्रणात आणण्यास अधिकार्यांना मार्गदर्शन केले.
नागरीकांना आवाहन
नागरीकांना ताप, मळमळ, पोटदुखी, (Typhoid fever) डोकेदुखी इत्यादी कोणतेही लक्षणे असल्यास त्वरीत गावात असलेल्या (Rural Hospital) ग्रामीण रुग्णालय चतारी येथे तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.