शेतकऱ्याची दिवाळी तहसीलवर साजरी करण्याचा इशारा!
मानोरा (Heavy Rain) : मानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सहाही मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना शासनाकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली जात असल्याचा आरोप परिवर्तन शेतकरी संघटनेचे प्रवर्तक मनोहर राठोड यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज नुसार कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर १८ हजार ५०० रुपये, हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये तर बहुवार्षिक बागायतीसाठी प्रती हेक्टर ३२ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार असल्याचे म्हटलेले असताना मात्र तालुक्यातील एकही शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट अठरा हजार पाचशे रुपये अद्यापही जमा झालेले नाही. केवळ सात-आठ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे.
नदी नाल्या काटाच्या शेतीचे फार मोठे नुकसान!
बागायतदार शेतकऱ्यांना (Farmers) कुठलीच मदत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे खचून गेलेला असताना शासनाकडून अपुरी मदत शेतकऱ्यांना मिळत आहे. एकीकडे राज्य शासनाने सुरू केलेले आनंदाचा शिधा हा दिवाळीला मिळणार असल्याने खरी गरज आता असताना तो मिळणार कधी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. पिक विमा संदर्भात शासनाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे कुठलेही धोरणात्मक कार्यक्रम न आल्यामुळे पिक विमा संदर्भातही शेतकऱ्यांची बोलवळ केली जात असल्याचा आरोपही मनोहर राठोड यांनी केला आहे. नदी नाल्या काटाच्या शेतीचे फार मोठे नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांचे खरे पंचनामे शासनापर्यंत पोहोचणार की नाही हा ही प्रश्न असून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे व पावसामुळे बुजलेली विहीर यांचे स्पॉट पंचनामे होऊन तात्काळ मदतीची गरज आहे. सरकारने (Govt) केवळ मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांना हवेत सोडण्याचा प्रकार शासनाने तात्काळ थांबून दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मदतीची पूर्ततां न केल्यास परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांची दिवाळी तहसील कार्यालयावर साजरी करणारा असल्याचा इशाराही मनोहर राठोड यांनी दिले आहे.