मानोरा (Umri Khurd Raid Village Daru DB team Action) : तालुक्यातील पोहरादेवी यात्रेनिमित्त बिट हद्दीत पोलिसांचा ताफा पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून उमरी खुर्द येथील अनिता भिमराव इंगोले यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता गावठी हात भट्टी दारूवर धाड टाकून ५५,००० हजार रुपयाचा (Umri Khurd Raid) मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, (Umri Khurd Raid) पोलिसांनी उमरी खुर्द येथील अनिता इंगोले यांच्या घराची झडती घेतली घरामध्ये १०० लिटर हात भट्टीची दारूने भरलेली काळया रंगाची टाकी किंमत १०,००० हजार रुपये व १००, १०० लीटर सडवा मोहमाचने भरलेल्या चार टाक्या किंमत ४०, ००० हजार रुपये व दारू गाळण्याचे साहित्य किंमत ५,००० असा एकूण ५५,००० रुपयाचा दारूसह मुद्देमाल जप्त केला.
अवैद्यरित्या गावठी दारू सह मुद्देमाल (Umri Khurd Raid) मिळून आल्याने तो पंचा समक्ष पोलिसांनी जप्त करून वरील आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डि बी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक अभिजीत बारे, पोहवा मदन पुणेवार , पोलीस शिपाई मनीष अगलदरे, रोहन तायडे, चालक पोलीस शिपाई करण चव्हाण, होमगार्ड गणेश पाटणकर, प्रविण जाधव यांनी केली.