परभणी/पाथरी(Parbhani):- सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर होणारी कारवाई स्थगित करावी या व अन्य मागण्यासाठी गुरुवारी लालसेना व अन्याय निवारण समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (march)काढण्यात आला होता.
विविध महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या कर्जा साठी जमीनदाराची जाचक अट रद्द करावी
मागील तीस चाळीस वर्षांपासून सरकारी व गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण (Encroachment) हटवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर होणारी कारवाई स्थगित करावी. या मुख्य मागणी साठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आ . बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात गुरुवार ४ जुलै रोजी सेन्ट्रल नाका, बस स्थानक, सेलू कॉर्नर मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांना निवेदन देण्यात आले. यात विविध महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या कर्जा साठी जमीनदाराची जाचक अट रद्द करावी, महामंडळाच्या कर्ज पुरवठ्यात ड्रॉ पद्धत बंद करावी, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे (Sahitya Ratna Annabhau Sathe) यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरु करावे व घरकुल बांधकामासाठी (Gharkul construction) वाळू उपलब्ध करावी या मागण्या करण्यात आल्या.
मोर्च्यात लालसेनेचे कॉ.गणपत भिसे व अन्याय निवारण समितीचे विशुद्धानंद वैराळ, अप्पासाहेब मोरताटे, संदीप दात्रे, ज्ञानेश्वर मोरे,मुंजा कांबळे,एड.रामभाऊ वैराळ, उत्तम झिंझुर्डे यांच्या सह दलित समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.