पुसद (Pusad):- येथील वसंतनगर मधील मुलीचा विवाह (marriage) दोन महिन्यापूर्वी पेढी पोखरी या गावातील मुलाशी झाला होता. पती-पत्नी दोघेही मुंबई येथे कामानिमित्त गेलेले होते. गावाकडे परतले. मात्र या विवाहितेचा निमोनिया आजाराने मृत्यू (Death)झाल्याची दुर्दैवी घटना दि.२५ जुलै रोजी उपचारादरम्यान उघडकीस आली. या घटनेने मात्र तरुण विवाहितेचा निमोनियाने मृत्यू झाल्याने पेढी पोखरी व वसंत नगरमध्ये शोककळा पसरली आहे.
विवाहितेला उपस्थित डॉक्टरांनी निमोनिया झाल्याचे सांगितले
प्राप्त माहितीनुसार, साक्षी सुमित धुळे वय १९ वर्षे रा.वसंत नगर असे मृत्यू झालेल्या तरुण विवाहितेचे नाव आहे. ती गौतम धवसे यांची मुलगी होती. साक्षी व सुमितचे दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.ती पतीसह मुंबई (Mumbai) येथे कामानिमित्त वास्तव्यास होती.त्यानंतर आषाढीला वसंतनगर येथील राहत्या घरी माहेरी आली होती.अशातच तिची प्रकृती खालावल्याने तिला पुसद येथील लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Multispeciality Hospital) उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. तेथील उपस्थित डॉक्टरांनी निमोनिया झाल्याचे सांगितले. उपचार सुरू असताना दि.२५ जुलै रोजीच्या सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तिच्या पार्थिवावर दि.२६ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान येथील उमरखेड रोडवरील मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार (funeral) केले जाणार आहे.