चार किलो तूर, डीएपीची एक बॅग व बकेटभर ह्युमिक ऍसिड!
हडोळती (Latur Farmer) : ह्युमिक ऍसिडचे एक बकेट, तुरीचे बियाणे चार किलो आणि डीएपीची एक बॅग, अशी तोकडी मदत घेऊन लातूरचे लाडके कृषी अधीक्षक हाडोळतीचे शेतकरी (Latur Farmer) मुक्ताबाई व अंबादास पवार यांच्या घरी धावले. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी थेट अंबादास पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून तुमच्या काय अडचणी आहेत ते जाणून घेण्यासाठी व मदत करण्यासाठी मी कृषी अधिकाऱ्यांना पाठवतो, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार लातूरचे अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके चार किलो तुरी, ह्युमिक ऍसिडची बकेट आणि डीएपीची (खत) एक बॅग या मदतीसह पवार यांच्या घरी पोहोचले. इतकेच नव्हे, तर त्यांनी पवार यांना शेती अवजारासाठी अर्ज करण्याचा मौलिक सल्लाही दिला.
कृषिमंत्री कोकाटे यांनी कृषी अधिकाऱ्यांना (Latur Farmer) वृद्ध शेतकरी दांपत्य पवार यांच्याकडे पाठवून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन शेतकरी यांना संपूर्णपणे मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा कृषी अधीक्षक शिवसांब लाडके यांचा लवाजमा शेतकरी अंबादास पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाला आणि सरकारकडून आणलेली मदत शेतकऱ्याकडे सुपूर्द केली. आता खरिपाचा पेरा झाल्यानंतर तुरीचे बियाणे पेरायचे कुठे? असा सवाल शेतकऱ्याला न पडला तर नवलच!
नाम फाऊंडेशन ने उचलला वर्षभराचा खर्च
नाम फाऊंडेशनने (Latur Farmer) वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांच्या यावर्षीचा शेतीचा संपूर्ण खर्च उचलला आहे. फाउंडेशनचे विलास चामे यांनी शेतकरी अंबादास पवार यांना भेटून ही माहिती दिली.