लोहमार्ग पोलिसात गुन्हे दाखल
रात्रीच्या वेळी चोर्यांचे प्रमाण अधिक
परभणी (Parbhani Railway Crime) : रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांजवळील मोबाईल, दागिने व इतर मौल्यवान साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या बाबत लोहमार्ग पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीच्या प्रवासात अधिक चोर्या होत आहेत. प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या साहित्याची सुरक्षितता निश्चित करावी, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
अजंठा एक्सप्रेसने २० ऑगस्ट रोजी प्रवास करत असताना परभणी रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर अदित्य एनामल्लामंदा या युवकाला त्याच्या जवळील बॅग आणि मोबाईल मिळून १३ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास (Parbhani Railway Crime) केल्याचे समजले. याच प्रमाणे एन. इलिसा हे प्रवाशी नरसापुर एक्सप्रेसने प्रवास करत असताना परभणी स्थानकावर गाडी आल्यानंतर त्यांच्या जवळील मोबाईल व इतर साहित्य मिळून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेल्याचे लक्षात आले.
गुरुप्रित सिंग चावला हे प्रवाशी हमसफर एक्सप्रेसने प्रवास करत असताना पूर्णा रेल्वे स्थानकावर आले असता त्यांच्या जवळील मोबाईल व इतर साहित्य मिळून १ लाख ६ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. उर्वशी सिंग बनवारीलाल या प्रवाशी मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेसने प्रवास करत होते. परभणी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांना रोख रक्कम, मोबाईल मिळून ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समजले.
विकास कांबळे हा विद्यार्थी निजामाबाद – पंढरपुर या रेल्वेने प्रवास करत असताना त्यांच्या जवळील १४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. रेल्वे प्रवासात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. (Parbhani Railway Crime) पोलिसांनी रेल्वेत गस्त वाढवावी, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.