वर्षभरापूर्वी मंजूर झालेला निधी खर्च करण्याची मागणी!
मानोरा (Vasantrao Naik School) : तालुक्यातील ज्या गावी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी प्राथमिक शिक्षण घेतले, त्या जिल्हा परिषदेची (Zilla Parishad) शाळा इमारत देखभाल व दुरुस्ती अभावी भग्नावस्थेत पोहोचल्याने या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेअंतर्गत गतवर्षी मंजूर झालेल्या लक्षावधी रुपयाची निधी कधी खर्च केल्या जाणार असा संतप्त सवाल अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला असुन, तात्काळ शाळा इमारत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराचे निवेदन (Statement) गट विकास अधिकारी यांना तालुका अध्यक्ष गणेश राठोड यांनी दिले आहे.
अ. भा. तांडा सुधार समितीची प्रशासनाकडे मागणी!
या महिन्याच्या 1 तारखेला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Former Chief Minister Vasantrao Naik) यांचे जयंती दिन तालुक्यासह संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून धडाक्यात साजरे करण्यात आली. तालुक्यातील ज्या शाळेत नाईक यांनी प्राथमिक शिक्षण घेतले, ती शाळा मागील काही वर्षांपासून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे भग्नावस्थेत पोहोचल्याने अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी शासन व प्रशासनाकडे (Governance and Administration) विविध मार्गाने पाठपुरावा करून या मोडकळीस आलेल्या वास्तूच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यास जिल्हा प्रशासनास (District Administration) भाग पाडले होते. संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेअंतर्गत सदरील शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी दहा लक्ष रुपये व शाळा प्रांगण सुशोभीकरणासाठी दहा लक्ष रुपये असा 20 लक्ष रुपयाचा निधी गतवर्षीच मंजूर करण्यात आलेला आहे.
तांडा सुधार समितीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा!
देखभाल व दुरुस्ती अभावी पडण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळा इमारतीसाठी मंजूर झालेली निधी तातडीने खर्च करण्यात येऊन शाळा इमारतीला उभारी न दिल्या गेल्यास तांडा सुधार समितीच्या (Tanda Improvement Committee) वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा गटविकास अधिकारी मानोरा (Group Development Officer Manora) यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.